Monday, May 5, 2008

Budhbhushanam (budhbhushan) By Sambhaji Raje




Budhbhushan (budhbhushanam)

a famous sanskrit novel budhbhushanam based on politics,maratha swarajya and philosophy.......now available in marathi..... as"budhbhushan"

jijau wachnalaya , shivsphurti pratishthan , maratha seva sangh, & jijai publications PUNE. Presents....


___________________________________________
JIJAI PUBLICATION'S


_____________________________________________________________
publication no. : 75.

"BUDHBHUSHAN"

written by-
CHHATRAPATI SAMBHAJIRAJE SHIVAJIRAJE BHOSALE.


TRASLATOR:-
( From Sanskrit To Marathi)
Dr.PRABHAKAR TAAKWALE.
Kothrud , PUNE.

PUBLISHED ON :-
2 nd Oct 2007 (mahatma gandhi jayanti)

EDITOR:-
Adov.Shailaja Molak,
Wishrantwadi,PUNE.

______________________________________
PUBLISHER:-
Mr.Kishor Kadu.
Jijai Publications,584,Narayan Peth,

Kanyashala Bus Stop,
Jijapur (PUNE). 411030.
PHONE NO.-020-24476539.

PRICE:- 350 RS ONLY.
*************************************************************
NOTE:ALL COPYRIGHTS RESERVED at JIJAI PUBLICATIONS.
*************************************************************
ABOUT THE BOOK-
ORIGINAL PHOTOGRAPH , AUTOGRAPH & RAJMUDRA OF SAMBHAJIRAJE
FIRST PAGE OF THE BOOK BUDHBHUSHAN

BACK SIDE VIEW OF BUDHBHUSHAN NOVEL


SPECIAL THANKS TO-
Dr.Prabhakar Taakwale.
Yugpurush Purushottam Khedekar.
Mrs.Shailaja Molak.
Mr. Dnyaneshwar Molak.
Mr. Kishor Kadu.
and
All Jijaupremi , shivpremi , shambhupremi...... sambhaji brigade,jijau brigade,maratha seva sangh and shivdharma family.
blog created by-
संभाजींचे नाटककारांकडून विद्रूप चित्रण - विश्‍वास पाटिल
, ता. १९ - प्रागतिक विचार आणि "बुधभूषण' ग्रंथ लिहिणारे पराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांचे विद्रूप चित्रण नाटककारांनी केल्याची टीका लेखक विश्‍वास पाटील यांनी येथे केली.शिवस्फूर्ती प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा "महाराणी ताराराणी पुरस्कार' डॉ. सुवर्णा निंबाळकर आणि "शिवपुत्र शंभुराजे पुरस्कार' डॉ. प्रभाकर ताकवले यांना पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. "शिवस्पर्श', "महाराणी ताराराणी', "महाराणी येसूबाई' या पुस्तकांचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. महापालिकेचे सभागृह नेते अनिल भोसले, उपायुक्त ज्ञानेश्‍वर मोळक, ऍड. शैलजा मोळक, सायली भिलारे, शार्दूल वाळिंबे आदी उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर पाटील यांनी मते मांडतानाच नाटककारांना टीकेचे लक्ष्य केले. वयाच्या चौदाव्या वर्षी "बुधभूषण' हा ग्रंथ लिहिणारे, वयाच्या २२ व्या वर्षी छत्रपती झालेले, देशात सर्वप्रथम धरणाची कल्पना मांडणारे, पोर्तुगीज- इंग्रजांचा धोका ओळखणारे, औरंगजेबाचे आक्रमण नऊ वर्षे रोखून ठेवणारे संभाजीराजे हे अविचारी असूच शकत नाहीत. नाटककार, साहित्यिकांनी त्यांच्या मनातले विष ओतून संभाजी राजांचे विडंबन केल्याची टीका पाटील यांनी केली. संभाजी राजांचा इतिहास महाराष्ट्राला विसरता येणार नाही. त्यांचे खरे चरित्र समोर आणण्यासाठी भव्य कलाकृती उभारण्याचे काम हाती घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सत्कार उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला.
"...हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरुपवान आहे. त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याचेकडे आकर्षण वाढविणारा मोठा गुण आहे. सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजीसारखाच मान देतात. फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते..."हे वर्णन केले आहे, 1672च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणा-या ऍबे कँरे या फ्रेंच प्रवाशाने.
महामानवांच्या चरित्रामुळे अस्मिता जागृत होते - गंगाधर बनबरे
पुणे, ता. २६ - समाजाच्या उन्नतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आला पाहिजे, कारण अशा महामानवांच्या चरित्रामुळे अस्मिता जागृत होत असते, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक गंगाधर बनबरे यांनी आज केले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या त्रिशतकोत्तर सुवर्णजयंतीनिमित्त "छत्रपती संभाजीराजे गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते नगरसेवक दीपक मानकर, अनिल भोसले, रवींद्र माळवदकर, अनिल शिरोळे यांना संभाजीराजे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मावळा टोप, संभाजीराजांचे चरित्र, शाल, पुष्पगुच्छ असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार शरद ढमाले, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर या वेळी उपस्थित होते. बनबरे म्हणाले, ""समाजव्यवस्था निर्माण करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी केले. संभाजी महाराजांनी आपल्या उण्यापुऱ्या बत्तीस वर्षांच्या आयुष्यात संस्कृत पांडित्य, इंग्रजी भाषेचे ज्ञान आत्मसात केले. समाज व्यवस्थेवर आधारित "बुधभूषणम' हा ग्रंथदेखील त्यांनी लिहिला. परंतु, काही लोक जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास समाजापुढे मांडत आहेत. आजची लढाई ज्ञान व बुद्धीची असल्याने त्या माध्यमातूनच त्यांना उत्तर द्या आणि या महान व्यक्तींचा केवळ वारसा न सांगता, त्यांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणा. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचे चरित्र नीट समजून घेतले पाहिजे, त्यांची सामाजिक, धार्मिक, साहित्यिक व सांस्कृतिक व्यवस्था अभ्यासली पाहिजे. तरच नव्या पिढीत एक वैचारिक आंदोलन जन्माला येईल.'' अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्थेत दुसऱ्यांदा निवड झालेल्या प्रा. आरती पाटील, प्रसिद्ध नेपथ्यकार नितीन देसाई यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. संभाजीराजे गौरव विशेषांक व "साहित्यिक युवराज संभाजीराजे' ग्रंथाचे कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रवीण गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.

Edit this page (you have permission) Edit this page (if you have permission) | Report spam Google Docs -- Web word processing, presentations and spreadsheets.